
अमरावती (डॉ तुषार देशमुख) ः नाशिक येथे नुकत्याच जालेल्या राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेत शानदार कामगिरी बजावणारा अमरावतीचा मुलांचा संघ मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
राज्यस्तरीय सेपक टकरॉ सीनियर स्पर्धेत २५ संघ सहभागी झाले होते. त्यात अमरावती पुरुष संघाने उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्या आठ संघात स्थान मिळवले असल्याने हा संघ मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. या संघामध्ये चांदुरबाजार येथील १२ खेळाडूंचा सहभाग होता. मोर्शी येथील २ तर अमरावती येथील १ खेळाडूंचा सहभाग होता. यामध्ये चांदुर बाजार व मोर्शी येथील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अमरावती संघाला पात्र ठरवले.
अमरावती संघाने बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर या संघांचा पराभव केला व उपांत्य सामन्यात प्रवेश मिळविला. या संघात सार्थक विधळे, देवान्ग पाटील, यश कोचे, संकेत आमले, सागर चौधरी, सर्वेश उमक, पियुष दाभाडे, रुद्र पिडगलवार, हर्षद बोंडसे, हर्षल पारिसे, स्वरित भिलपावर, सर्वेश ठाकरे, अमर मानकर, साहिल वानखडे यांचा समावेश होता. या संघांचे प्रशिक्षक डॉ तुषार देशमुख हे होते. या संघांचे सेपक टकरॉ राज्य संघटनेचे उपाध्यक्ष डॉ हनुमंत लुंगे, शिवाजीयन्स स्पोर्ट्स क्लबचे मार्गदर्शक व जी सी टोम्पे महाविद्यालयाचे अध्यक्ष भाष्कर टोम्पे, डॉ विजय टोम्पे, डॉ सुगंध बंड, डॉ तुषार देशमुख, आनंद उईके, पंकज उईके, डॉ हरीश काळे, प्रवीण मोहोड यांनी अभिनंदन केले आहे.