
नागपूर ः महाराष्ट्र स्ट्रेन्थ लिफ्टिंग असोसिएशनच्या सहा खेळाडूंची भारतीय स्ट्रेन्थलिफ्टिंग व इन्कलाईन बेंच प्रेस संघात निवड करण्यात आली आहे.
बारावी जागतिक स्ट्रेन्थ लिफ्टिंग व इन्कलाईन बेंच प्रेस स्पर्धा पटाया (थायलंड) येथे १६ ते १९ जुलै दरम्यान होणार आहे. या स्पर्धेकरिता नागपूर येथील एस बी जैन कॉलेजमधील उज्ज्वल आगरकर व मानसी शाहू, अनुष्का ठेंगरे, शशांक पारधी यांची निवड झाली. तसेच वाशीम येथे पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या संगीता ढोले यांची निवड झाली आहे. नागपूरच्या सौरभ रंगारी यांची तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र स्ट्रेन्थ लिफ्टिंग असोसिएशनचे आश्रयदाते प्रमोद वालमांडरे, बाबा डवरे, अध्यक्ष हेमंतकुमार डोणगावकर, उपाध्यक्ष किशोर बागडे, सचिव आनंद डाबरे, श्रीकांत वरणकर, सचिन माथने, लक्ष्मीकांत मेश्राम, चंद्रशेखर ढबाले, श्रेयस रंगारी आदींना सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.