 
            रोझलँड संघ उपविजेता, पोद्दार स्कूलला तृतीय क्रमांक
जळगाव ः आंतर शालेय सुब्रतो फुटबॉल चषक स्पर्धेत ओरियन सीबीएसई स्कूल संघाने विजेतेपद पटकावले. रोझलँड स्कूलचा संघ उपविजेता ठरला तर पोद्दार स्कूल संघाने तिसरा क्रमांक संपादन केला.
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव शहर महानगरपालिका आयोजित जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व गोदावरी फाउंडेशन पुरस्कृत आंतरशालेय सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेला गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या क्रीडांगणावर सुरुवात झाली. १५ वर्ष वयोगटात मनपा स्तरीय स्पर्धेत अंतिम सामना रोझलँड आणि ओरियन सीबीएससी यांच्यात खेळला गेला. या लढतीत ओरियन सीबीएसई स्कूल संघाने सडन डेथ मध्ये विजय मिळवला आणि विजेतेपद पटकावले. रोझलँड संघ उपविजेता ठरला. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूलने सेंट जोसेफचा ६-० असा पराभव करून तृतीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेचे उद्घाटन
स्पर्धेचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर वैभव पाटील, कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर विजयकुमार पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारूक शेख यांच्या हस्ते करण्यात आले. विद्या इंग्लिश स्कूलचा खेळाडू रोहन सुनील विसावे याने क्रीडांगण पूजन केले. डॉक्टर वैभव पाटील यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेला सुरुवात केली. स्पर्धेचे नाणेफेक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले. या वेळी क्रीडा अधिकारी सचिन निकम, गोदावरीचे डॉ नितीन भोळे, क्रीडा शिक्षक राहील अहमद, छाया बोरसे, राष्ट्रीय खेळाडू अरबाज खान, वसीम रियाज, तौसिफ शेख, वसीम चांद , साबीर अहमद आदींची उपस्थिती होती.
पारितोषिक वितरण समारंभ
स्पर्धेतील विजयी व उपविजयी संघातील प्रत्येक खेळाडूला सुवर्ण व रौप्य पदक स्पोर्ट्स हाऊस जळगावचे आमीर शेख यांच्यातर्फे देण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य विजयकुमार पाटील, जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख, क्रीडा अधिकारी सचिन निकम, छाया बोरसे, जयंत जाधव, राहील अहमद, साबीर अहमद वसीम चांद यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारुक शेख यांनी केले. जयंत जाधव यांनी आभार मानले.



