वसंतराव पाटील यांना मल्लगुरू पुरस्कार जाहीर

  • By admin
  • July 12, 2025
  • 0
  • 89 Views
Spread the love

मुंबई ः प्रतिष्ठा फाउंडेशन आणि गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य मल्लगुरू पुरस्कार वसंतराव पाटील यांना जाहीर झाला आहे.

गुरुवर्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदरचे सर्वेसर्वा वसंतराव पाटील यांना गुरुवर्य मल्लगुरू पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे.

लोकप्रिय खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व प्रख्यात शिक्षण तज्ञ डॉ अभय कुमार साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरित होणार आहे . हा पुरस्कार सोहळा १३ जुलै रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होईल. राजश्री शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी हा सोहळा होणार आहे. आखाड्यातील सर्व पैलवान, पालक व पदाधिकारी तसेच समस्त भाईंदर वासियांतर्फे वसंतराव पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *