
दोन षटकार ठोकत पंतने इंग्लंडविरुद्ध सर्वांना मागे टाकले
लंडन : ऋषभ पंत स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पंत कसोटी क्रिकेटमध्ये एकदिवसीय स्वरूपाप्रमाणे फलंदाजी करतो. आता इंग्लंड दौऱ्यावर सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याच्या बॅटमधून खूप धावा निघत आहेत. पंत जोपर्यंत क्रीजवर असतो तोपर्यंत चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ७४ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने ८ चौकार आणि दोन षटकार मारले आहेत.
व्हिव्हियन रिचर्ड्सला टाकले मागे
या डावात दोन षटकार मारून ऋषभ पंत इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे आणि नंबर-१ सिंहासन गाठले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत त्याने आतापर्यंत ३६ षटकार मारले आहेत. त्याने महान व्हिव्हियन रिचर्ड्सचा विक्रम मोडला आहे. रिचर्ड्सने इंग्लंडविरुद्ध कसोटीत ३४ षटकार मारले होते.
सर्वाधिक धावा करणारे यष्टीरक्षक
ऋषभ पंत आता इंग्लंडमधील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा परदेशी यष्टीरक्षक बनला आहे. त्याने न्यूझीलंडच्या टॉम ब्लंडेलचा सर्वकालीन विक्रम मोडला आहे. पंतने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत आतापर्यंत एकूण ४१६ धावा केल्या आहेत. २०२२ च्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या भूमीवर यष्टीरक्षक म्हणून ब्लंडेलने ३८३ धावा केल्या.
सर्वाधिक धावा करणारे परदेशी यष्टीरक्षक
ऋषभ पंत – ४१७ धावा, वर्ष २०२५
टॉम ब्लंडेल – ३८३ धावा, वर्ष २०२२
वेन फिलिप्स -३५० धावा, वर्ष १९८५