
बुधवारी होणार अंतिम निवड चाचणी
जळगाव ः जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे रविवारी वरिष्ठ गटाच्या निवड चाचणीचे आयोजन जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रिकेट मैदानावर केले होते. यात १३५ क्रिकेट खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यातील ६० खेळाडूंची जळगाव जिल्ह्याच्या प्राथमिक संघात निवड करण्यात आली आहे.
ही निवड संजय पवार, प्रशांत विरकर, कैलास पांडे, डॉ संतोष बडगुजर, सुयश बुरकुल यांच्या निवड समितीने केली. निवड झालेल्या ६० खेळाडूंदरम्यान निवड चाचणीचे सामने खेळवण्यात येतील व त्यातूनच अंतिम संघ निवडण्यात येईल. निवड झालेल्या खेळाडूंनी बुधवारी (१६ जुलै) सकाळी १० वाजता प्रशिक्षक मुश्ताक अली यांच्याकडे जैन स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर रिपोर्ट करावे असे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव अविनाश लाठी यांनी कळविले आहे.
निवड झालेले खेळाडू
जगदीश झोपे, नीरज जोशी, नचिकेत ठाकूर, क्रिश नाथनी, पवन पाटील, निहाल शेख, आजाद खान, क्रिश दंडोरे, अली कुरेशी, लोकेश पाटील, मानव टिबरेवाला,हर्षवर्धन पाटील, मनीष चव्हाण, निनाद पाटील, कार्तिक काळे, पंकज सोनवणे, भूपेंद्र पाटील, शतायु कुलकर्णी, सुनेद शेख, सुरज जाधव, सनी मोरे, सचिन भोई, उबेद खाटीक, कार्तिक मारवाडी, प्रथमेश सरोदे, चंद्रशेखर देव, यशदीप घोरपडे, गौरव ठाकूर, आर्यन नाथानी, साहिल गायकर, बिपिन चांगरे, अफ्फान शेख, दीपज्योतसिंग आनंद , रोहन पाटील, रोहित बारी, एकांत नाईक, गणेश पाटील, सचिन पाटील, यतीन पाटील, दुर्गेश पाटील, सुदर्शन सूर्यवंशी, अभिषेक पाटील, मयूर चव्हाण, रोशन भडांगे, राज बेलदार, रितेश माळी, केशव ठाकूर, साई बानाईत, ललित पाटील, शैलेश पाटील, रोहन कोलते, प्रतीक शिंदे, सौरभ गायकवाड, सुरज खंडागडे, वेदांत पवार, प्रद्युम्न महाजन, सुरज खंडेलवाल, कृष्णा माळी, शैलेश अहिरे, झुलकद नैन पिरजादे यांची निवड झाली आहे.