सायकलिंग स्पर्धेत रुतुजा, उज्वला, संस्कृती अव्वल

  • By admin
  • July 14, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘अस्मिता खेलो इंडिया महिला सायकलिंग लीग’चे यशस्वी आयोजन

छत्रपती संभाजीनगर ः महिला सायकलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यांना राष्ट्रीय स्तरावर वाव मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ‘अस्मिता खेलो इंडिया महिला सायकलिंग लीग’ स्पर्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

ही स्पर्धा खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत क्रीडा प्राधिकरण (साई), भारत सरकार, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, स्पीड सायकलिंग स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्‌घाटन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे मार्गदर्शक सुदाम रोकडे व जिल्हा सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुगे यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव प्रा संजय साठे, खजिनदार भिकन अंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी एपीआय शेळके हे होते. या स्पर्धेत बिडकीन, पैठण, छत्रपती संभाजीनगर शहर येथील ३०० ते ३५० मुली व महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला. तसेच बिडकीन पोलिस स्टेशन संपूर्ण स्टाफ यांची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मदत झाली. तसेच रेड्डी स्पोर्ट्स अकॅडमीचे बळीराम राठोड, युसुफ पठाण, सोनाली अंबे, रवी जाधव, अनिल कांबळे, गणेश बनसोडे, भाऊसाहेब मोरे, पूजा अंबे यांचे सहकार्य लाभले.

स्पर्धेचा अंतिम निकाल

सीनियर महिला (१८ ते ३५ वर्ष) २० किमी ः १. ऋतुजा गणेश खाटीक, २. ⁠रजनंदिनी जाधव, ३. ⁠तनुजा पांडुरंग गाडेकर.

ज्युनियर गर्ल्स (१६ ते १८ वर्ष) १० किमी ः १. उज्वला रायफल रूपेकर, २. ⁠रोशनी चिंतामण चव्हाण, ३. ⁠प्रिया विष्णु तिघोटे, ४. आरती लक्ष्मण सुरासे, ५. भक्ती किसन हजारे.

सब ज्युनियर गर्ल्स (१० ते १५ वर्ष) ५ किमी ः १. संस्कृती संतोष गाढवे, २. ⁠दिव्या सुधीर हंकर, ३. खुशी गणेश जाधव, ४. पूजा गोविंद हिवाळे, ५. श्रुती संजय हिवाळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *