
अमरावती ः अमृतसर (पंजाब) येथे २० ते ३० जुलै या कालावधीत होणाऱया अखिल भारतीय सीबी रॉय ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी इंडिपेंडट फुटबॉल अकादमीचा खेळाडू अंश वानखडे याची महाराष्ट्र ज्युनियर मुलांच्या संघात निवड झाली आहे.
वेस्टर्न इंडिया मुंबई क्रीडा संघटनेच्या वतीने मुंबई कुपरेज फुटबॉल मैदान येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये अंश वानखडे याने आक्रमक गोलकीपरची चाचणी दिली आणि आपल्या अप्रतिम खेळाने निवड समिती सदस्यांना प्रभावित केले व राज्य संघात स्थान प्राप्त केले.
त्याच्या या निवडीने येथील फुटबॉल खेळाडूंमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली असून या उदयमुख खेळाडूने २०२१ मध्ये वेस्टर्न इंडिया फुटबॉल राज्य संघात प्रतिनिधित्व केले होते. आता पुन्हा राज्य संघात निवड झाल्याबद्दल इंडिपेंडट फुटबॉल अकादमीचे अध्यक्ष बाळासाहेब सोलिव, सचिव दिनेश म्हाला, फुटबॉल कोच हरिहरनाथ मिश्रा, अचलपूर तालुका फुटबॉल असोसिएशनचे सचिव तुषार देशमुख, नयन वानखडे, इंडिपेंडट अकादमीच्या महिला कोच मोनिका कडू, इंडिपेडट अकादमीचे उपाध्यक्ष बब्बु लालुवाले, करिम भाई, सदानंद जाधव, सुमेध भिमटे, अक्षय मांगळूकर, शुभम चैवरे, साहिल सोलिव, छोटु दाभाडे, समीर खान, प्रीती भैसे, तुषार लोखंडे, इम्रान खान यांनी अभिनंदन केले आहे.