
सेलू ः १६ जुलै हा जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिन आहे आणि डॉ व्यंकटेश वांगवाड वाढदिवसाच्या निमित्ताने नितीन कला व क्रीडा मंडळ सेलू व परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने जिल्हास्तरीय खुल्या टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन १६ जुलै रोजी नितीन क्रीडा मंडळ, पारीख कॉलनी, सेलू या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत विजेता खेळाडूंना रोख पारितोषिक व ट्रॉफी दिली जाणार आहे. प्रथम बक्षीस २ हजार रुपये व ट्रॉफी, द्वितीय बक्षीस १ हजार रुपये व ट्रॉफी आणि तृतीय बक्षीस ५०० रुपये व ट्रॉफी अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा पुरुष व महिला गटात खेळविण्यात येईल. स्पर्धा एकेरी (सिंगल) मध्ये खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण २५ वर खेळाडूंचा सहभाग असणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत विजेता पुरुष आणि महिला खेळाडू राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी (दिल्ली) पात्र ठरणार आहे. या स्पर्धेसाठी रोख बक्षीस एक लाख रुपये राहिल. परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार हरीभाऊ लहाने, राज्य सचिव गणेश माळवे, संदीप लहाने, चंद्रशेखर नावाडे, जिल्हा सचिव सतीश नावाडे, प्रशांत नाईक, संजय भुमकर, राजेश राठोड आदींनी केले आहे.