
ठाणे (रोशनी खेमानी) ः ब्राह्मण सेवा संघ ठाणे यांच्या वतीने १४ एप्रिल २०२५ रोजी संस्कृत शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेत एस एम एम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ठाणे येथील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी वेदा रवी देशपांडे हिला २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात संस्कृत विषयासाठी स्कॉलरशिप प्राप्त झाली. याबद्दल रोख रक्कम व प्रशस्तिपत्र देऊन वेदा देशपांडे हिला गौरविण्यात आले.
वेदा देशपांडे हिने अभ्यासातील सातत्य आणि मेहनत यामुळे हे यश मिळवले. ही स्कॉलरशिप आणि प्रशस्तिपत्र श्री कारेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संस्थेच्या वतीने होतकरू विद्यार्थ्यांना दिले जाणारे हे सन्मानचिन्ह त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन ठरत आहे. वेदा हिच्या या यशाबद्दल तिच्या शिक्षकांचे, पालकांचे व शाळेचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.