
शिरपूर ः महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व धुळे जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५ साठी राज्यस्तरीय खो-खो पंच परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यात संस्थेच्या तारासिंग पावरा व संजय मोते या दोन खो-खो मार्गदर्शकांनी सहभाग नोंदविला आणि परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मानही संपादन केला.

किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असे शैक्षणिक संकुल असून संकुलातील खेळाडूंना योग्य ते तांत्रिक प्रशिक्षण मिळावे या हेतूने विविध प्रकारांच्या वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मोफत स्वरूपात खेळाडूंना शालेय वेळा व्यतिरिक्त नियमित स्वरूपात देण्यात येते. संस्थेचे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांचे ज्ञान अद्यावत राहावे या दृष्टीने संस्थेच्या क्रीडा विभागाच्या वतीने विविध प्रशिक्षण व उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असतात; त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व धुळे जिल्हा खो-खो असोसिएशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५ साठी राज्यस्तरीय खो-खो पंच परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यात संस्थेच्या तारासिंग पावरा व संजय मोते या दोन खो-खो मार्गदर्शकांनी सहभाग नोंदविला होता.
या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून परीक्षेत संस्थेचे उत्तर विभाग क्रीडा प्रमुख व कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर माध्यमिक शाळा वाडी येथील उपशिक्षक तारासिंग उदेसिंग पावरा यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर संस्थेचे खो-खो प्रशिक्षक संजय मोते यांनी उत्तम गुणांनी परीक्षा पास केली. या दोन्ही खो-खो मार्गदर्शकांच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्ष आशाताई रंधे, संचालक राहुल रंधे, रोहित रंधे, शशांक रंधे, संजय गुजर, धुळे जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग बडगुजर, सचिव अनिल संचेती, सहसचिव अविनाश वाघ, मुख्याध्यापक पी एम सोनवणे, निलेश चोपडे, संस्थेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा राकेश बोरसे, क्रीडा समिती विशेष सल्लागार डॉ लिंबाजी प्रताळे, एम टी चित्ते तसेच सर्व व्यवस्थापक, प्राचार्य, मुख्याध्यापक व क्रीडा विभाग प्रमुखांनी भरभरून कौतुक केले.