
पनवेल ः इंडॉस्कॉटिश स्कूल, मानसरोवर कामोठे पनवेल यांच्या वतीने आयोजित मान्सून फुटबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. अंडर १६ मुलांच्या गटात श्री मावळी मंडळ शाळेच्या फुटबॉल संघाने जबरदस्त कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले आणि आपला ठसा उमटवला.

या स्पर्धेत अनेक नामांकित शाळांनी सहभाग घेतला होता. अत्यंत कठीण स्पर्धात्मक वातावरणात मावळी मंडळ शाळेच्या खेळाडूंनी एकदिलाने खेळ करत अंतिम फेरी गाठली. त्यांच्या टीमवर्क, चिकाटी आणि कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशामध्ये खेळाडूंच्या अथक मेहनतीसोबतच प्रशिक्षक अतिफ पठाण यांचे तांत्रिक मार्गदर्शन, क्रीडा शिक्षक प्रमोद वाघमोडे यांचे प्रेरणादायी प्रशिक्षण, तसेच शाळेचे प्राचार्य, क्रीडा विभाग आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या संघात हर्ष कदम, दिव्यांशू चौधरी, स्वरूप गवळी, प्रेम पटेल या खेळाडूंचा समावेश होता. प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून प्रवीण मोरे, अतिफ पठाण यांनी भूमिका बजावली. या शानदार कामगिरीबद्दल क्रीडा शिक्षक प्रमोद वाघमोडे, सर्व एसपीसी प्रशिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व संस्थेचे पदाधिकारी यांनी
खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.