
पाकिस्तान संघ भारतात येणार नाही
नवी दिल्ली ः या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ बंगळुरूमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. मात्र, पाकिस्तान संघ त्यांचे सराव सामने आणि विश्वचषक सामने श्रीलंकेत खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ यांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ इंग्लंडसोबत २५ सप्टेंबर रोजी बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर पहिला सराव सामना खेळेल. दुसरा सराव सामना विश्वचषक सुरू होण्याच्या तीन दिवस आधी २७ सप्टेंबर रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळला जाईल. पाकिस्तानचे सराव सामने २५ आणि २८ सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये श्रीलंका आणि श्रीलंकेच्या अ संघांसोबत होतील. पन्नास षटकांचा विश्वचषक १२ वर्षांनंतर भारतीय उपखंडात होत आहे. ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत बेंगळुरू, गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्टणम आणि कोलंबो, श्रीलंका या पाच शहरांमध्ये हे सामने खेळवले जातील.
सराव सामन्यांचे वेळापत्रक
२५ सप्टेंबर : बेंगळुरू – भारत विरुद्ध इंग्लंड बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स-१ मैदानावर, दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर. कोलंबो – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान कोलंबो क्रिकेट क्लबवर, बांगलादेश विरुद्ध श्रीलंका ए आर प्रेमदासा स्टेडियमवर.
२७ सप्टेंबर : बेंगळुरू – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स-१ मैदानावर, भारत विरुद्ध न्यूझीलंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर. कोलंबो – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश कोलंबो क्रिकेट क्लबवर.
२८ सप्टेंबर : बेंगळुरू – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत ए बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स-१ मैदानावर. कोलंबो – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका ए कोलंबो क्रिकेट क्लबवर.