
साक्री (जि धुळे) ः धुळे जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धेत साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संघने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले.
धुळे येथील एसएसव्हीपीएस कॉलेज मैदानावर ही स्पर्धा झाली. जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत साक्रीच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संघाने अंडर १७ मुलांच्या गटात अंतिम सामन्यात दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूल संघाला पेनल्टी किकवर नमवत विजेतेपद पटकावले. सन २०२५-२६ चा जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप पटकावून शाळा व संस्थेचा नावलौकिक करत मानाचा तुरा खोवला.
या विजेतेपदामुळे साक्रीच्या न्यू इंग्लिश स्कूल संघाची विभागीय पातळीवर निवड झाली आहे. विजयी संघातील सर्व खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष पराग बेडसे, सेक्रेटरी अनिल सोनवणे, विश्वस्त गजेंद्र भोसले, दीपक अहिरराव, संजय पाटील, यू एल बोरसे तसेच व्यवस्थापक मंडळ सदस्य उज्वला बेडसे, लालाजी मोरे, सुनीता नाईक, प्राचार्य प्रमोद बेडसे, उपप्राचार्य प्रतिभा शिवदे, उपमुख्याध्यापक विलास गोसावी, पर्यवेक्षक अविनाश सोनार, बन्सीलाल बागुल सतीष सोनवणे यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच क्रीडा शिक्षक महेंद्र साबळे, नरेंद्र सोनवणे, प्रसाद भाडणेकर प्रा अभिजित सोनावणे, पंकज पाटील, रणजित ठाकरे, तसेच क्रीडा संकुल येथील मार्गदर्शक अनिल पाटील, धंनजय सोनवणे, मनीष जाधव, प्रणव बाविस्कर, तेजस देसले यांनी सदर संघास मार्गदर्शन केले.