आदिवासी विद्यार्थ्यांची १२५२० पदभरती ४५ दिवसांत भरण्याची मागणी

  • By admin
  • July 16, 2025
  • 0
  • 38 Views
Spread the love

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

छत्रपती संभाजीनगर ः आदिवासी अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सर्व रिक्त जागा त्वरित भरा या व इतर अनेक मागण्यांसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन एआयएसएफतर्फे  क्रांती चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला. शिस्तीत आणि भर पावसात रस्त्याच्या एका बाजूने कोणालाही त्रास न देता काढलेल्या या मोर्चाचे शहराने कौतुक केले.

आदिवासी विद्यार्थ्यांची १२५२० रखडलेली पदभरती व इतर विभागातील रिक्त पदांची भरती ४५ दिवसांच्या आत करण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही जाहीर होतील आणि आचारसंहिता लागेल. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी या सर्व पदभरतीच्या जाहिराती काढल्या जाव्यात या मुख्य मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने हा मोर्चा काढला होता.

२१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयनुसार अनुसूचित जमातीची बळकावलेली पदे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिकामी करून भरायची होती परंतु शासनाने गेल्या सहा वर्षात केवळ ७८१० पदे रिकामी केली आणि यापैकी फक्त १३४३ पदे भरण्यात आली, अद्यापही आदिवासी विद्यार्थ्यांची ११२२७ पदे रिक्त आहेत.

१. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक ८९२८/२०१५ व इतर याचीका मध्ये सहा जुलै २०१७ रोजी निर्णय दिला या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पिठात रिट याचिका क्र ३१४०/२०१८ या प्रकरणात राज्यात शासकीय व निमशासकीय सेवेत आदिवासींसाठी राखीव असलेले तब्बल १२५२० पदे गैर आदिवासींनी खोटी जात प्रमाणपत्र सादर करून बळकवलेली असल्याचे प्रतिज्ञापत्र खुद्द राज्य शासनाने दिले होते तरी देखील अद्याप ११२२७ पदे न भरल्याचे दिसत आहे.

२. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या क्षत्रिय कार्यालयात अनुसूचित जमातीचे गट अ ते गट ड या संवर्गातील १५४१ रिक्त पद ४५ दिवसाच्या आत मध्ये भरण्यात यावी.

३. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले तब्बल २९ पदे गायब केली असल्याची धक्कादायक माहिती, माहितीतिच्या अधिकारातून समोर आली,
यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे २९ पदे ४५ दिवसाच्या आत मध्ये भरण्यात यावी.

४. आदिवासी विकास विभाग क्षत्रिय कार्यालयात जून २०२४ अखेर ४४४० पदे रिक्त आहेत. आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक,ठाणे, अमरावती, नागपूर येथे क्षत्रिय कार्यालयासह एकूण ३० आदिवासी प्रकल्प कार्यरत आहेत या क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकूण १५ हजार ३५९ पदे मंजूर आहेत,
त्यापैकी मंजूर गट अ ची २११ गट ब ३३२ गट क ११७७१ गट ड  २०४५ भरलेली पदे गट १३२ गट ब १४५ गट क ७४६८ गट ड १९१३ रिक्त पदे गट अ ८० गट ब १८७ गट क ४०४१ गट ड १३२ असे एकूण ४४४० पदे रिक्त आहेत. १४ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय असून गट क गट ड पदे अडीच वर्षे झाली भरण्यात आली नाहीत.

वरील सर्व रिक्त पदांची भरती ४५ दिवसाच्या आत मध्ये पूर्ण करण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत पाठवण्यात आले. क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मोर्चा काढण्यात आला. निवेदन अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकणे यांनी स्वीकारले व राज्य शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.

ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्याध्यक्ष वैभव चोपकर, राज्य उपाध्यक्ष‌ प्रसाद गोरे, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे माजी राष्ट्रीय महासचिव अभय टाकसाळ, शहराध्यक्ष मधुकर गायकवाड, शहर उपाध्यक्ष विशाल बोराडे, शहर सचिव अनंता कऱ्हाळे, सहसचिव उमेश इंगळे, यादव भडंगे, आनंदा कोठुळे, रूपाली पोटे, जयश्री मिराशे, नितीन मेंढे, गणेश इंगळे, कैलास काळे, राजू टारफे, पल्लवी ढोले आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या मोर्चात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *