
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा उपसंचालक पद हे २०२२ पासून रिक्त होते. या रिक्त पदावर शेखर विठ्ठलराव पाटील यांची नागपूर विभागातून छत्रपती संभाजीनगर येथे प्रशासकीय बदली झाली आहे. शेखर पाटील यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे.

क्रीडा उपसंचालक युवराज नाई यांच्याकडून शेखर पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाचा पदभार स्वीकारला. या प्रसंगी परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, जालना जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे, क्रीडा प्रबोधिनी प्राचार्या पुनम नवगिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.