
यवतमाळ ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व यवतमाळ जिल्हा परिषद आणि यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी एक सहविचार बैठक घेण्यात आली. या बैठकीत दहा खेळाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये बुद्धिबळ, कबड्डी, क्रिकेट, मैदानी स्पर्धा, कुस्ती, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, योगासन, फुटबॉल, खोखो या खेळांचा समावेश आहे.
या सभेचे आयोजन अभ्यंकर कन्या शाळेत करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांची सभा तालुका क्रीडा संयोजक किरण फुलझेले यांनी आयोजित केली होती.
सर्वप्रथम तालुका क्रीडा संयोजक किरण फुलझेले यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये दहाही खेळांचे आयोजन कशा प्रकारे करायचे आहे ते त्यांनी सांगितले आणि खो-खो खेळात काही नवीन बद्दल झाले आहेत त्याबद्दल अविनाश जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी शारीरिक शिक्षकांला क्रीडा स्पर्धा विषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले. त्यावेळी जवाहरलाल नेहरू माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण गुल्हाने, अभ्यंकर कन्या शाळेचे उपमुख्याध्यापक अविनाश जोशी, अँग्लो हिंदी हायस्कूलचे पर्यवेक्षक संजय सातारकर, तालुका क्रीडा संयोजक व यवतमाळ जिल्हा शारीरिक शिक्षक व एकविध क्रीडा संघटनेचे सचिव किरण फुलझेले हे मंचावर उपस्थित होते.
या बैठकीस शारीरिक शिक्षक अभ्यंकर कन्या शाळाचे संजय बट्टावार, लोकनायक बापूजी विद्यालयाचे शारीरिक शिक्षक पिशुष भुरचंडी, संजय दंडे, सरोजनीबाई लोणकर माध्यमिक विद्यालय, वरझडीचे शारीरिक शिक्षक राजु खुनकर, देवराव वसंतराव पाटील विद्यालयाचे चंद्रशेखर धामंदे , हेमंत फुंके, श्रीराम गायमुखे, अजय मिरकुटे, निखिल बुटले, संजय कोल्हे, नितीन कन्नमवार, सिद्धार्थ भगत, बंटी गुप्ता, अविनाश भनक, यशवंत नाईक, एम जी हामंद, प्रफुल गावंडे, एम जी सावलकर, किसन जाधव, वेदधारिणी माध्यमिक शाळेचे राऊत आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुल ढोणे यांनी केले.