
मुंबई ः वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातून फेब्रुवारी २०११ मध्ये निम्न श्रेणी लघुलेखिका पदावरुन शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सुप्रिया लाडे यांनी नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत ५००० मीटर चालण्याच्या वयवर्षे ७० प्लस स्पर्धेत ५५.२९.८ वेळेची नोंद करुन ब्राँझ पदक मिळवले.
सुप्रिया लाडे यांना शालेय जीवनापासून खेळाची आणि अभिनयाची आवड, होती. थ्रोबाॅल, कबड्डी, खो-खो आणि ॲथलेटिक्स १०० मीटर धावणे गोळा-फेक, लांब-उडी इत्यादी खेळात त्या सहभागी झाल्या. शाळा, महाविद्यालयीन, त्यानंतर नागपूरहून मंत्रालयात आल्यानंतर सचिवालय जिमखाना स्पर्धेत सांघिक तसेच अनेक वैयक्तिक बक्षिसे त्यांनी मिळवली आहेत. महाविद्यालयीन जीवनात कामगार कल्याण केंद्रांतर्गत झालेल्या खेळाच्या स्पर्धेमध्येही अनेक बक्षिसे तसेच, कामगार कल्याण केंद्राच्या नाट्यस्पर्धेत नाटकाला आणि अभिनयासाठी प्रथम पारितोषिक त्यांना मिळाले होते. डोंबिवली येथे त्या सातत्याने आज देखील नियमित सराव करतात.