
मुंबई ः बंगळुरू येथे नुकत्याच जागतिक वरीष्ठ बॅडमिंटन संघाची निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात दिलीप सुखटणकर व सावित्री मोहनराज यांची भारतीय बॅडमिंटन संघात ६५ प्लस मिश्र दुहेरी गटात निवड करण्यात आली आहे.
सावित्री मोहनराज हिची ६५ प्लस महिला एकेरी व ६५ प्लस महिला दुहेरीत पण निवड झाली. त्याबद्दल या दोघांचे अनेक खेळाडू, मित्रमंडळी व नातेवाईक यांनी खूप अभिनंदन करून त्या दोघांना शुभेच्छा दिल्यात. जागतिक वरीष्ठ बॅडमिंटन स्पर्धा, सहा ते बारा सप्टेंबर २०२५ मध्ये थायलंड येथे होणार असून त्यामध्ये ३५ प्लस ते ७५ प्लस पुरूष व महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा गटात होणार आहे.