जळगाव येथे बाहेती स्मृती कॅरम स्पर्धा 

  • By admin
  • July 17, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

जळगाव ः ॲड. सीताराम बाहेती यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ ते ३ ऑगस्ट २०२५ दरम्यान कान्ताई सभागृह (जुना नटराज थिएटर), जळगाव येथे संपन्न होणार आहे.

या स्पर्धेसाठी एकूण १५ हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. ही पारितोषिके ॲड. रोहन बाहेती यांच्या सौजन्याने दिली जाणार आहेत. या स्पर्धेचे प्रमुख संयोजक मंजूर खान (९९७०६४७८६८) व तांत्रिक प्रमुख सय्यद मोहसिन (७०२०६ ७३३५७) यांच्याशी स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून कय्यूम खान व शेखर नरवरिया कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व कॅरमपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा व आपल्या कौशल्याची चमक दाखवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे उपाध्यक्ष मंजूर खान यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *