
चॅलेंजर रनर्स फाउंडेशनचा सलग चौथा उपक्रम
सोलापूर ः देशप्रेम, फिटनेस आणि सामाजिक सहभागाचा आदर्श निर्माण करणारे चॅलेंजर रनर्स फाउंडेशनतर्फे सलग चौथ्या वर्षी ७८ किमी अल्ट्रा रनिंगचा एक अनोखा आणि ऐतिहासिक उपक्रम १४ व १५ ऑगस्टला राबवण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २०२२ मध्ये सुरू झालेला हा उपक्रम दरवर्षी १ किमीने वाढवत, यंदा ७८ किमीपर्यंत पोहोचला आहे. हा उपक्रम १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुरू होऊन १५ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या उपक्रमाच्या अधिकृत लिंकचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्व क्रीडाप्रेमीसाठी सहभाग आणि प्रोत्साहनासाठी आमंत्रण असून सहभागी होण्यासाठी लिंक सक्रिय आहे. नोंदणीसाठी संपर्क अतिश शहा (9175828203) अथवा सचिव चंद्रशेखर गायकवाड ( 7350513197) यांच्याशी संपर्क साधावा.
असे आहे उपक्रमाचे स्वरूप
व्हर्च्युअल रन (१ ते १५ ऑगस्ट दरम्यान, कोठेही): ३, ५, १०, १५ आणि २१ किमी
ऑन-रोड अल्ट्रा रन (१४-१५ ऑगस्ट, सोलापूर शहरात) : २५, ५० आणि ७८ किमी