
विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाड्यातील क्रीडा तपस्वी, क्रीडा महर्षी सुधीर दादा जोशी यांचा क्रीडा क्षेत्रातील वारसा अव्यहातपणे आणि प्रामाणिकपणे पुढे नेणारे महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचे सरचिटणीस प्रोफेसर डॉ मकरंद जोशी यांची छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिष्ठित मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या नियमित प्राचार्यपदी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या कार्यालयात त्यांचा छोटेखानी सत्कार समारंभ विविध मान्यवरांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी शिक्षा संस्कृति उत्थान न्यासाचे
अश्विन राजनेकर, स्पोर्ट्स प्लस या क्रीडा दैनिकाचे मुख्य संपादक सुधीर भालेराव, राष्ट्रीय ओबीसी प्राध्यापक महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रोफेसर डॉ पंढरीनाथ रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्यपदाची ही नवी जबाबदारी, आपल्या कर्तृत्वाला नवी भरारी देणारी आहे. तुमच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय येणाऱ्या काळात नक्कीच उजळेल आणि यशाची नवी क्षितिज गवसेल असे मत प्राचार्य डॉ मकरंद जोशी यांनी व्यक्त केले.