बीपीएड शिक्षक आता राज्य पुरस्कारासाठी पात्र ठरणार 

  • By admin
  • July 18, 2025
  • 0
  • 77 Views
Spread the love

महाराष्ट्र राज्य क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्याला यश
 
पुणे ः महाराष्ट्र राज्य क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्यास मोठे यश लाभले आहे. बीपीएड अर्हता आता राज्य पुरस्कारासाठी मान्य करण्यात आली आहे.

शासनाच्या राज्य पुरस्कार नियमात बीएड समकक्ष बीपीएड अर्हता प्राप्त शिक्षकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश लाभले आहे. महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रतिवर्षी शालेय शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये बीपीएड अर्हता प्राप्त क्रीडा शिक्षकांना केवळ एकच पुरस्कार दिला जात असे.

बीएड अर्हता प्राप्त शिक्षकांच्या कॅटेगिरित बीपीएड अर्हता प्राप्त शिक्षकांचा समावेश नव्हता. या अर्हता प्राप्त शिक्षकांचा राज्य पुरस्कारासाठी बीएड समकक्ष विचार व्हावा अशी मागणी महासंघाने केली होती. यासाठी सतत केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून या संदर्भातला शासन निर्णय शासनाने निगर्मित केला आहे. यापुढे इतर सर्व शिक्षकांच्या कॅटेगिरित बीपीएड शिक्षकांचा शासनाच्या शालेय विभागातर्फे प्रतिवर्षी दिल्या जाणाऱया राज्य व राष्ट्रीय पुरस्कारासाठी समावेश करण्यात आलेला आहे, अशी माहिती राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, कार्याध्यक्ष अनिल आदमाने, उपाध्यक्ष मिलिंद क्षीरसागर, सचिव चांगदेव पिंगळे यांनी दिली आहे.  

महासंघाच्या भूमिकेला मोठे यश 
महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यामध्ये बीपीएड अर्हता प्राप्त क्रीडा शिक्षकांना मात्र केवळ एकच पुरस्कार देण्यात येत असे, आणि बीपीएड अर्हता प्राप्त शिक्षकांचा स्वतंत्रपणे विचार होत नव्हता. त्यामुळे अनेक पात्र शिक्षक राज्य पुरस्कारापासून वंचित राहत होते.

या अन्यायकारक परिस्थितीच्या विरोधात महासंघाने ठाम भूमिका घेत, बीएड समकक्ष मान्यता मिळावी अशी मागणी सातत्याने शासनाकडे केली. या मागणीस अखेर यश मिळाले असून शासनाने स्पष्ट निर्णय घेऊन आजचा शासननिर्णय प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे पुढे इतर सर्व शिक्षकांप्रमाणे बीपीएड अर्हता प्राप्त शिक्षकांनाही शासनाच्या शालेय विभागामार्फत दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय पुरस्कारासाठी संधी मिळणार आहे. हा निर्णय क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे अशी प्रतिक्रिया मुंबई विभाग संपर्क प्रमुख व ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी व्यक्त केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *