
जळगाव ः जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल संघाने उपविजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आणि जळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ही स्पर्धा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे पार पडली.
१५ वर्षांखालील मुलांच्या गटात अमळनेरच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल संघाने आव्हानात्मक विजयाचे दावेदार संघ डॉक्टर उल्हास पाटील स्कूल सावदा ५-०, सेंट मेरी स्कूल एरंडोल ३-०, शानबाग हायस्कूल ,सावखेडा इत्यादी संघांचा मोठ्या फरकाने पराभव केला आणि आपला दबदबा कायम ठेवत सलग ४ विजय प्राप्त केले. मागील वर्षी विजेता असलेला लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम जामनेर याच्यासोबत झालेल्या अंतिम लढतीत स्वामी विवेकानंद संघाला अवघ्या १ गोलच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. उपविजेते ठरलेल्या संघाचे सर्व क्रीडा शिक्षक, आयोजक व खेळाडू यांनी त्यांच्यातील कौशल्याचे व खेळाडूवृत्तीचे भरभरून कौतुक केले.
विद्यार्थी खेळाडूंनी मिळवलेल्या या शानदार यशाबद्दल स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल संस्थेचे अध्यक्ष चेअरमन नीरज अग्रवाल, संस्थेच्या अध्यक्षा सितिका अग्रवाल, मुख्याध्यापक विनोद अमृतकर व सर्व शिक्षक वृंद व क्रीडा विभाग यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख योगेश पाटील, क्रीडा शिक्षक जय जाधव, क्रीडा शिक्षक विनय निरंकारी यांनी मेहनत घेतली व मार्गदर्शन केले.
१५ वर्षांखालील उपविजेता मुलांचा संघ
शुभम विनोद कुमार (कर्णधार), बबलू प्रदीप वर्मा, अर्णव गिरीश पाटील, निमित्त प्रवीण साळुंखे, आदेश कुलभूषण चव्हाण, भव्य श्रेणिक कोठारी, हितेश दीपक पाटील, यशोदीप शिवाजी पाटील, भावेश प्रमोद पाटील, अथर्व प्रमोद पवार, उमंग संदीप पाटील, आरव अमर पाटील, संमेक गोपाल बिऱ्हाडे.