
गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण
सांगली ः जत तालुक्यातील रेवनाळ येथील रेवनाळ हायस्कूल विद्यालयात गुरुपौर्णिमा व गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी सर्व गुरुजनांचा सत्कार या विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना शाल गुलाब पुष्प श्रीफळ देऊन संपन्न झाला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये संस्था समन्वय समितीचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीपराव वाघमोडे व गावातील शिक्षण प्रेमी व्यक्ती माजी सैनिक आबासाहेब पुजारी, माजी सरपंच धनाजी पाटील, प्राध्यापक प्रकाश हूलेनवर तसेच संजय हुलेनवर, सरपंच सविता तोरवे, विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सुवर्णा वाघमोडे, राजक्का ओलेकर, कलावती जाधव यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या व विषयात प्रथम येणाऱ्या मुला-मुलींना कायमस्वरूपी ठेवलेली पारितोषिक वितरित केली गेली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रतापराव शिंदे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डी ए वाघमोडे हे होते या कार्यक्रमात मुला-मुलींची भाषणे झाली व शेवटी पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर गुरू महात्म्य काय असते हे डी ए वाघमोडे सरांनी अध्यक्षीय भाषणात सर्वांना पटवून सांगितले.
तिप्पेहळी गावचे माजी सरपंच माजी प्राचार्य प्रतापराव शिंदे, डॉ प्रणाली शिंदे, डॉ वैष्णवी शिंदे, डॉ अभिजीत शिंदे, युवराज शिंदे यांनी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदांचे फेटा शाल-बुके देऊन सत्कार केला. या कार्यक्रमासाठी रेवनाळ गावचे सरपंच सविताताई तोरवे, उपसरपंच संजय वाघमोडे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष मनोहर पवार, तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश वाघमोडे, माजी शिक्षक लोखंडे, नितीन तोरवे व कविता वाघमारे, सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होनमाने ए बी यांनी केले. प्रवीण वाघमोडे यांनी आभार मानले.