‘शेततळे’ घातक व जीवघेणे ठरू नये म्हणून प्रत्यक्ष शेततळ्यावरच मार्गदर्शन

  • By admin
  • July 19, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद अंबेलोहळ शाळेतर्फे उपक्रम 
छत्रपती संभाजीनगर ः जल हे जीवन आहे ते मृत्यूचे कारण ठरू नये म्हणून प्रत्येकाला जल व तरणाची संपूर्ण माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन, शिक्षण व प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने कार्यरत राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनच्या वतीने आवाज दो म्हणजे धोकादायक-जीवघेणे जलसाठे व जलस्त्रोतांची संपूर्ण माहिती प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे हा आहे.

आवाज दो या उपक्रमा अंतर्गत बळीराजासाठी वरदान ठरलेले शेततळे इतरांसाठी घातक व जीवघेणे ठरू नये म्हणून  शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेत तळ्यावरच नेऊन माहिती, मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली.

जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, पोलीस विभाग, ग्राम पंचायत अंबेलोहळ, जिल्हा परिषद प्रशाला अंबेलोहळ व राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आवाज दो या उपक्रमा अंतर्गत धोकादायक जलस्त्रोतांची माहिती जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी शाळांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे.

मागील काही महिनाभरातील सर्व प्रकारच्या अपघाती मृत्यूचे अवलोकन केले तर असे लक्षात येते की रोड अपघाताच्या खालोखाल पाण्यात बुडून अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. सुमारे वीस ते पंचवीस प्रकारचे नैसर्गिक व कृत्रिम जलसाठे व जलस्त्रोत आहेत. त्यातीलच एक महत्वाचा जलस्त्रोत म्हणजे ‘शेततळे’. या शेततळ्यामध्ये बुडून मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांपूर्वीच्या  घटनांचा तपशील बघितल्यास काही महत्वपूर्ण बाबी लक्षात येतात ज्या मृत्यूसाठी कारणीभूत आहेत. 

एका पेक्षा अधिक म्हणजे दोन-तीन-चार असे जे मृत्यू पाण्यात होतात याचे एकमेव कारण म्हणजे एक जण बुडतोय व इतर मग तो मित्र असेल, नातेवाईक असेल, भाऊ – बहीण असेल, जो बुडतांना बघतो आणि वाचविण्याचा प्रयत्न करतो ते सर्वच बुडतात. कारण माहिती व प्रशिक्षणाचा अभाव आणि नित्याचा सराव नसणे हे आहेत.
शेततळे घातक असण्याचे कारण म्हणजे त्याची रचना. एखादी व्यक्ती जेव्हा शेततळ्या जवळ जाते तेव्हा त्याला दिसते पाणी आणि पाण्याचा मोह. म्हणजे पाण्यात खेळणे, मौज मस्ती करणे किंवा पोहण्याचा मोह होणे. पण त्यापूर्वी जर प्रत्येकाला शेततळ्याच्या लांबी-रुंदी व खोलीचा अंदाज असेल, त्याबद्दल माहिती असेल तर ५० टक्के दुर्घटना टळण्यास मदत होईल. या शेततळ्यात जेव्हा पाणी भरले जाते त्या नंतर सुर्य प्रकाशामुळे त्या पाण्यात शेवाळ तयार होते आणि हेच शेवाळ घातक व जीवघेणे ठरते. कारण आधीच शेततळ्याच्या चारही भिंतींना तीव्र उतार आहे त्यात त्या शेवाळलेल्या म्हणजे अधिकच घातक ठरतात.

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना जलस्त्रोतांची माहिती करून देण्यासाठी  जिल्हा परिषद संभाजीनगरचे कार्यकारी अधिकारी अंकित साहेब व शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, अश्विनी लाटकर, सुनीता नवले, तसेच समाधान आराक, अनिल कुमार सकदेव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनचे प्रमुख राजेश भोसले तसेच मुख्याध्यापक आर आर दुम्मलवार, केंद्रप्रमुख गोरख काळवणे, महेंद्र पाटील, गोपालकृष्ण नवले, जितेंद्र पाटील, प्रशांत हिवर्डे, संदिप मुंडलिक, अमित कुलकर्णी, शरद जाधव, विठ्ठल भडके आदी परिश्रम घेत आहेत.

शेततळ्यात पडून मृत्यूची कारणे

  • पाय घसरून पडणे
  • अचानक तोल जाणे 
  • पोहण्याचा मोह होणे 
  • शेततळ्याच्या लांबी रुंदी व खोलीचा अंदाज नसणे 
  • मौज मस्ती करणे, ढकला ढकली करणे

–  पोहण्या विषयी अपूर्ण माहिती व सराव 

  • पोहण्यासाठी मित्रांचा आग्रह 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *