
अध्यक्ष मनीष लखाणी यांची माहिती
मलकापूर ः महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन मार्गदर्शनाखाली बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणा अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल जाभरूळ रोड बुलढाणा येथे २६ ते २७ जुलै रोजी ही स्पर्धा संपन्न होणार आहे. बुलढाणा जिल्हातील जास्तीत जास्त रजिस्टर खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मनीष लखाणी यांनी केले आहे.
पुढील महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या सीनियर राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेससाठी तसेच आगामी काळात पालघर येथे होणाऱ्या ज्युनिअर व अहिल्यानगर येथे होणाऱ्या सबज्युनिअर राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भाग घेणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात खेळाडूंची निवड व जिल्हा संघात खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणाचे सचिव विजय पळसकर यांनी सांगितले आहे.
जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत फक्त बुलढाणा जिल्हातील खेळाडूंनाच सहभाग घेता येईल. या अजिंक्यपद स्पर्धात खालील वयोगटात खेळली जाणार असून ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील मुले व मुली एकेरी व दुहेरी या प्रकारात तसेच सीनियर पुरुष व महिला स्पर्धेच्या आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. सदर स्पर्धेत जे बुलढाणा जिल्ह्यातील एमबीए रजिस्टर खेळाडू असेल त्यांनाच सहभागी होता येईल. तसेच स्पर्धेला येताना सर्व खेळाडूंनी आपआपले आधार कार्ड घेऊन येणे आवश्यक राहील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी.
सदर सदर स्पर्धेतून प्राविण्य प्राप्त खेळाडूंची निवड जिल्हा संघात होणार असून निवड झालेल्या खेळाडूंना राज्य स्पर्धेत बुलडाणा जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा. या स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी tplive या लिंकवर जाऊन २३ जुलैपूर्वी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक राहील. वेळेवर कोणत्याही खेळाडूला सदर स्पर्धेत भाग घेता येणार नाही असे बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष खिजर ह्यात खान यांनी कळविले आहे.