
जळगाव ः आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी येत्या २७ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन २७ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रिकेट मैदानावर विद्या इंग्लिश स्कूलच्या मागे जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. ज्या मुलांचा जन्म दिनांक ०१.०९.२०१४ ते ०१.०९.२०११ यातील असेल त्या मुलांना निवड चाचणीत सहभागी होता येईल. सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग https://forms.gle/bkw2XVvFdcY9dKLi7 या लिंकवर जाऊन गुगल फॉर्म ऑनलाईन भरून आपला सहभाग नोंदवावा. तसेच सोबत आपले ओरिजनल आधार कार्ड व क्यूआर कोड असलेल्या जन्म दाखला अपलोड करावा. तसेच निवड चाचणी शुल्क १०० रुपये व क्रिकेट साहित्य पांढरा गणवेश व शूज ओरिजनल क्यूआर कोड असलेल्या जन्म दाखला/आधार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे (९४०४९५५२०५) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३) यांच्याशी संपर्क साधावा.