
यवतमाळ ः यवतमाळ तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन जायंट्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २२ जुलै रोजी करण्यात येणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व यवतमाळ जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन २२ जुलै रोजी जायंट्स इंग्लिश मीडियम स्कूल, वडगाव यवतमाळ येथे करण्यात येत आहे .
यामध्ये १४ वर्षांखालील मुले व मुली, १७ वर्षांखालील मुले व मुली आणि १९ वर्षांखालील मुले व मुली असे तीन गटांमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचे तालुका स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड व यवतमाळ तालुका संयोजक किरण फुलझेले यांनी केले आहे.