
सिन्नर (जि. नाशिक) ः सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत सिन्नर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सहविचार सभा २१ जुलै रोजी संपन्न होणार आहे.
या सहविचार सभेसाठी नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील व तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन यु पाटील यांच्या उपस्थितीत क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा संपन्न होणार आहे. ही सभा सोमवारी (२१ जुलै) सकाळी दहा वाजता गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर या ठिकाणी होणार आहे. या सभेस क्रीडा शिक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन यू पाटील आणि तालुका क्रीडा संयोजक प्रा पी एम खैरनार यांनी केले आहे.