वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल संघाची चमकदार कामगिरी

  • By admin
  • July 19, 2025
  • 0
  • 98 Views
Spread the love

निफाड ः राष्ट्रीय मिनी फुटबॉल फाईव्ह स्पर्धा नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने चमकदार कामगिरी बजावली.

या स्पर्धेत वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने कर्णधार समर्थ कायस्थ, अथर्व जावरे, प्रसाद बडवर, संकप्ल पंडित, यशवंत अण्णा, चैतन्य गायकवाड, आदेश जंगम या खेळाडूंनी शानदार कामगिरी बजावली.

रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व्ही डी व्यवहारे, संस्थेचे विश्वस्त अॅड आप्पासाहेब उगांवकर, रतन पाटील वडघुले, किरण कापसे, राजेंद्र राठी, अॅड दिलीप वाघवकर, राजेश सोनी, प्रभाकर कुयटे, मधुकर राऊत, विश्वास कराड, नरेंद्र नांदे, शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी सानप यानी अभिनंदन केले व पुढील वाढचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा प्रशिक्षक सुभाष खाटेकर, क्रीडा शिक्षक विलास गायकवाड यांचे मार्गदर्शन या संघाला लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *