
मुंबई ः नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या योनेक्स सनराईज दुसरी अंडर १९ राज्यस्तरीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत मुंबई उपनगरच्या सोळा वर्षीय अर्जुन रेड्डी याने विजेतेपद पटकावले.
अर्जुन रेड्डी याने उपउपांत्य फेरीत तिसऱ्या मनांकित ठाण्याच्या ओम गवंडी याचा १८-२१, २१-८, २१-२ असा पराभव केला, पुढील उपांत्य फेरीत द्वितीय मानांकित पालघरच्या ऋतवा सजवान याचा २१-१३, २१-१६असा सरळ सामन्यात पराभव केला. अंतिम फेरीत मुंबई उपनगरचा आर्यन तलवार याचा २१-१६, २१-१६ असा सरळ सेट मध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. अर्जुन सध्या हैदराबाद येथील भास्कर बाबू बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षण घेत आहे.