
तुळजापूर ः श्री कुलस्वामिनी विद्यालय तुळजापूर येथे हरित धाराशिव अंतर्गत विद्यालयामध्ये मुख्याध्यापक राजकुमार ठोंबरे व अनिल धोत्रे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आहे.
विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख अनिल धोत्रे व अशोक सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष दिंडी काढून विद्यार्थ्यांना ‘एक पेड एक मा के नाम’ या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना आपल्या आई सोबत एक झाड लावून त्याचे संगोपन करण्यास सांगण्यात आहे. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार ठोंबरे, प्रा. हराळकर, सिद्धेश्वर कबाडे, अशोक सोमवंशी, संतोष कोठावळे, बालाजी कांबळे, दिलीप भालेराव, विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अनिल धोत्रे तसेच विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.