सुभाष बुबणे स्मृती टेबल टेनिस स्पर्धा दोन ऑगस्टपासून

  • By admin
  • July 20, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

सोलापूर ः सुभाष भालचंद्र बुबणे स्मृती करंडक जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा २ व ३ ऑगस्ट रोजी पार्क स्टेडियमवरील मुळे पॅव्हेलियनमध्ये आयोजित केली आहे.

ही टेबल टेनिस स्पर्धा ११, १४, १७ वर्षे मुले व मुली आणि महिला व पुरुष आणि प्रौढ एकेरी गटात होईल. २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता ११ वर्षे मुले व मुली, १४ वर्षे मुले तसेच ७.३० वाजता पुरुष एकेरी व प्रौढ एकेरीचे सामने होतील. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता १४ वर्षे मुली, १७ वर्षे मुले व मुली आणि महिला एकेरीचे सामने होतील. संध्याकाळी ४.३० वाजता सर्व अंतिम सामने होतील. सायंकाळी ७ वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होईल. प्रवेशिका १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत झेड एम पुणेकर यांच्याकडे स्वीकारले जातील. स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन हर्षवर्धन बुबणे व सोलापूर ज़िल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ राजीव प्रधान यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *