महाराष्ट्र कॉर्फबॉल संघात गौरव, आरव, शुभ्राचा समावेश

  • By admin
  • July 20, 2025
  • 0
  • 39 Views
Spread the love

राज्य संघाच्या प्रशिक्षकपदी विपुल कडची नियुक्ती 

छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्राच्या सब-ज्युनिअर कॉर्फबॉल संघात शुभ्रा कुंटे, आरव भंडारी व गौरव तत्तापुरे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त व एनआयएस प्रशिक्षक विपुल कड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

भारतीय कॉर्फबॉल महासंघ व तामिळनाडू कॉर्फबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन रिसर्च, तांबरंम, चेन्नई  येथे २१व्या सब-ज्युनिअर व तिसाव्या कनिष्ठ गटांच्या राष्ट्रीय कॉर्फबॉल अजिंक्यपद  स्पर्धेचे आयोजन येत्या २४ ते २७ जुलै या कालावधीत करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र कॉर्फबॉल संघटनेच्या वतीने अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी, पिंपरी चिंचवड, पुणे येथे मागील आठवड्यात संघ निवड चाचणी व सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीमधून महाराष्ट्र राज्याच्या सब-ज्युनिअर कॉर्फबॉल संघात छत्रपती संभाजीनगरच्या शुभ्रा कुंटे, आरव भंडारी व गौरव तत्तापुरे यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या कॉर्फबॉल संघात गौरव तत्तापुरे याची दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त बास्केटबॉल खेळाडू व एनआयएस प्रशिक्षक विपुल कड यांची महाराष्ट्र राज्याच्या सहायक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

एमएसएम बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल मुख्य प्रशिक्षक गणेश कड यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्र राज्याचा कॉर्फबॉल संघ पुणे येथून राष्ट्रीय कॉर्फबॉल स्पर्धेभागी २२ जुलै रोजी चेन्नईला रवाना होणार आहे.

गौरव तत्तापुरे, आरव भंडारी व शुभ्रा कुंटे व आंतरराष्ट्रीय खेळाडू व एनआयएस प्रशिक्षक विपुल कड यांची राष्ट्रीय कॉर्फबॉल स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे सचिव हेमंत पातूरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ मकरंद जोशी, विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ सचिन देशमुख, तसेच राज्य कॉर्फबॉल संघटनेचे किशोर बागडे, प्रवीण मानवतकर, डॉ गौतम जाधव, सचिन वावले, छत्रपती संभाजीनगर जिल्हा हौशी कॉर्फबॉल संघटनेचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मोहिते, उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ उदय डोंगरे, जिल्हा कोर्फबॉल संघटनेचे सचिव गणेश कड, सहसचिव प्रशांत बुरांडे, रेणुका कड, विश्वास कड, मंदा कड, अनिस साहुजी, आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *