
नाशिक ः नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक आयोजित १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट निवड चाचणी नाशिक येथील दत्ता मोगरे स्टेडियम येथे उत्साहात संपन्न झाली. यामध्ये नाशिक शहरातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या निवड चाचणी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वुमन्स डायरेक्टर धनश्री गिरी, महाराष्ट्र संघटनेचे उपाध्यक्ष विलास गिरी, नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव धनंजय लोखंडे व दर्शन थोरात इत्यादी उपस्थित होते.
भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल माहिती व भविष्यात टेनिस क्रिकेटला किती महत्त्व आहे याबद्दल माहिती सांगितली. नाशिक शहरातून व इतर तालुक्यातून एकूण ५५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या जिल्हास्तरीय निवड निवड चाचणीतून सोलापूर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडू नाशिक संघाचे नेतृत्व करणार आहे.