
सुब्रोतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा गाजवली
छत्रपती संभाजीनगर : गायकवाड ग्लोबल स्कूलच्या १५ व १७ वर्षांखालील मुलांच्या संघांनी सुब्रोतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत नवा इतिहास रचला ! गायकवाड ग्लोबल स्कूल संघाने सुब्रोतो फुटबॉल स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय सुब्रोतो फुटबॉल स्पर्धेत गायकवाड ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत १५ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. स्टेपिंग स्टोन स्कूलविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात संघाने अत्युत्तम कौशल्य, संघ भावना आणि जिद्द दाखवत उत्कृष्ट कामगिरी केली. अत्यंत अटीतटीच्या सामन्यानंतर, संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आणि रौप्य पदक जिंकून शाळेसाठी गौरवाची आणि अविस्मरणीय अशी क्षण रचना केली.
डिफेन्स करियर अकादमीविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात गायकवाड ग्लोबल स्कूलने उत्कृष्ट खेळ दाखवत २-० विजय कामगिरी करून कांस्यपदक पटकावले. या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक प्रणव तारे, योगेश जाधव, अमृता शेळके, जितेंद्र चौधरी, अर्जुन नायर, सायली किर्गत यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेचे व्यवस्थापन अध्यक्ष प्रा रामदास गायकवाड, संस्थापिका संचालिका कालिंदा गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक कुलभूषण गायकवाड, संचालक नंदकुमार दंदाले आणि प्राचार्य डॉ सुलेखा ढगे यांनी संघातील विद्यार्थ्यांचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि या प्रेरणादायी यशासाठी कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कष्टांचे कौतुक केले आणि शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडामूल्यांना प्रोत्साहन देण्याच्या शाळेच्या कटिबद्धतेची पुनः पुष्टीकेली.