
ईव्हीएम अॅपद्वारे विद्यार्थ्यांनी निवडले आपले प्रतिनिधी
साक्री (जि. धुळे) ः साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी साक्री संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साक्री येथे ईव्हीएमद्वारे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली.
साक्री येथे २१ जुलै रोजी लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळासाठी मतदान घेण्यात आले. प्रथमत:च या निवडणूकीत ईव्हीएम अॅपचा वापर करुन मतदान घेण्यात आले. सर्वप्रथम ईव्हीएम अॅपवर सर्व विद्यार्थ्यांचे नाव व फोटो अपलोड करण्यात आले. उमेदवार विद्यार्थ्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ देण्यात आला.
मतदान अधिकारी क्रमांक १ म्हणून भूषण बोरसे यांनी सांभाळत मतदारांची ओळख पटविण्याचे काम पाहिले. मतदान अधिकारी २ म्हणून कुणाला नांद्रे यांनी सांभाळत मतदारांच्या बोटाला शाई लावली व मतदान अधिकारी ३ म्हणून सचिन पिंपळे यांनी काम पाहत बॅलेट देण्याचे काम सांभाळले. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून पंकज पाटील यांनी कामकाज पाहिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद भाडणेकर व रणजित ठाकरे यांनी कामकाज सांभाळले.
मतदान सुरू करण्यापुर्वी सर्व मतदारांना विद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब प्रमोद बेडसे यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक दादासाहेब अविनाश सोनार व दादासाहेब बन्सीलाल बागुल यांच्या निरीक्षणात मतदान पार पडले. या कामी अविनाश भदाणे, सुरेश मोहने, मिलिंद सोनवणे, महेंद्र साबळे, पराग नेरकर, सचिन बहिरम, सतिष नेरे, मयुर ठाकरे, अरुण गावीत, लक्ष्मीकांत देवरे, मीना सूर्यवंशी, सुनंदा शिंगाणे यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने निवडणूक कशी पारपाडली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.