
पुणे ः पुणे जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने गोविंदा गार्डन मंगल कार्यालय, सोमेश्वरवाडी, बाणेर येथे आयोजित आमदार विनायक निम्हण स्मृती बुद्धिबळ स्पर्धा ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी एक लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
ही बुद्धिबळ स्पर्धा ८, १०, १२, १५ व खुला गट अशा विविध गटात घेण्यात येणार आहे. रोख पारितोषिकांशिवाय २० ट्रॉफी व अनेक मेडल्स विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येक वयोगटात किमान १० पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. ही स्पर्धा सोमेश्वर फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण आयोजित करत आहेत. तांत्रिक सहकार्य पुणे जिल्हा बुद्दिबळ संघटना व मास्टर चेस अकादमी देणार आहे.
पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे हे स्पर्धा संचालक असून स्पर्धा समन्वयक म्हणून दीक्षा गडसिंग तसेच प्रमुख पंच म्हणून गुरुजित सिंग हे काम बघणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन स्पर्धा आयोजक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे. स्पर्धेसाठी राजेंद्र कोंडे (९८२२३०३५४०), दीक्षा गडसिंग (७५८८०२२३६८) यांच्याशी संपर्क साधावा.