
छत्रपती संभाजीनगर ः वाळूज येथील श्री नारायणा मार्शल आर्ट संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बेल्ट व प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. व्यंकट मैलापुरे तसेच बेरील साचीस, उत्तम साळवे, रेजिना रॉडिक्स आणि संस्थेचे संचालक शंकर महाबळे व भाग्यश्री महाबळे हे कार्यक्रमाला उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध बेल्ट्स व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
बेल्ट प्राप्त खेळाडू
यलो बेल्ट – मयूर वाघ, विनायक साखरे, कृष्णा मातलकर, सानिध्य निर्मले, श्रुती खेत्री, वैष्णवी वाघ, श्रावणी मतसागर, मानसी माळी, अनुष्का वैद्य, स्वरा गावंडे, सृष्टी गावंडे, इशान राजपूत, रणवीर राजपूत, अधिराज देवडे, स्वरा मोरे, वेदिका शिंदे, स्वरूप जाधव, दिव्या वाकळे, शौर्य वाकळे, हर्षा त्रिपाठी, अस्तव्य राऊत, अर्जित सुधाकर, आरोही सुधाकर, शिव करडे, अद्वैत सोनवणे, सानवी वाहाडने, प्रज्वल बजाज, नक्षत्रा वाघ, यज्ञेश कांकरज, जान्हवी पवार, सानवी पवार, दक्षित साठे, समृद्धी पवार, विराज पोकळे, धैर्या ललवाणी, श्रेयस लोहगले, गौरी जिराख, श्रीलेखा वधेकर.
ऑरेंज बेल्ट – संस्कार कुसकर, भूषण कोंडके, मयंक माळी, आदित्य घाईट, राजलक्ष्मी बहिरट, ऋषभ रावत,अनन्या शेळके, पुहा किलेदार,नक्ष मुळे, माही वाघ, वीर जयभय, रुद्रा भाकले, सायली जगताप, अंजली कुंभार, प्राची पटणे, श्रेया साखरे, श्रेयस साखरे, आरोही झळके, मयुरी झळके, ऋषिकेश कोळी, तृप्ती तायडे, अनिरुद्ध दीपके, वेदिका कुचेकर, सर्वेश ताकोडे, राजवीर कुचेकर, प्रणित तायडे , सर्वेश बांगर, समर्थ दवणे, प्रतीक नड्डे, उत्कर्ष काळे, शिवम शहा, विहान पाटील.
ग्रीन बेल्ट – संघर्ष दवणे, आयुष अधाने हिरवा पट्टा, स्वयम् होले ,ऋषी वाघ, पलक मांडवी, स्वरा घाडगे, वेदिका सोनवणे, रिशिता शेट्टे, अतिश गवळी, हर्षवी दुधाळे , सई सोळंके, जुई सोळंके, राजवीर सलामपुरे, शिवम चौधरी, शिवम अनंतकर, साक्षी पराडकर.
ब्ल्यू बेल्ट – कौशल गर्दे, रुद्र अधाने, अक्षरा सातपुते, दिव्या होले, यश मुळे, रुद्रा भोसले, समृद्धी काकडे, अर्णव आढाव, राज कोळी , सानिध्या ढोके, प्रज्वल माने, विज्ञासू चौधरी.
ब्राऊन फर्स्ट बेल्ट – आर्यन अधाने, महेश कदम, अर्णव राठोड, समृद्धी पालकर, जानवी वसे, तन्मय खेडकर, युवराज राठोड, दिव्या जाधव, रूद्र दवणे, मृत्युंजय वर्मा.
ब्राऊन सेकंड बेल्ट – राजकुमार भणगे,आदित्य म्हैसमाळे, इशिका इंगोले, संभव नाहर, सार्थक त्रिभुवन, श्रुती त्रिभुवन.
ब्राऊन थर्ड बेल्ट – प्रथमेश पवार,दुर्गेश आढाव , कृष्णा भोसले, गणराज नाईक, गायत्री गंगोत्री, सई पवार, हर्षल पवार, सिया राजपूत, सिद्धी वाघमारे, साईराज राऊत, यथार्थ राठोड.
प्रशिक्षण व आयोजनात योगदान
प्रशिक्षक श्रीनय जाधव, महेश गीते, महेश मोरे, राम यादव, वरद जाधव, तेजस राठोड, आणि प्रगती शिंदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.
मान्यवरांचे मनोगत
डॉ व्यंकट मैलापुरे यांनी खेळांचे जीवनातील महत्व विशद करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. बेरील साचीस मॅडम यांनी प्राणिमात्रांवरील दया आणि भटक्या कुत्र्यांपासून सुरक्षिततेबाबत जनजागृती केली. उत्तम साळवे यांनी संस्थेस भावी उपक्रमांसाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. रेजिना रॉडिक्स यांनी महिलांनी स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट शिकावे, असे आवाहन केले. सर्व विद्यार्थ्यांना श्री नारायणा मार्शल आर्ट संस्थेचे प्रमुख शंकर महाबळे आणि भाग्यश्री महाबळे यांचे मार्गदर्शन लाभले.