
श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये लोकशाही प्रक्रियेतून निवडणूक
छत्रपती संभाजीनगर ः गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सोमवारी अनुभवली. मतदान करून ‘हेड बॉय आणि हेड गर्ल’ ची निवड करण्यात आली आहे.
तत्पूर्वी, एक पात्रता परीक्षा घेण्यात आली. यामधून जो प्रथम येईल असे प्रत्येकी एक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची निवड प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे नामनिर्देशन पत्र भरण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी चिन्हाचे वाटप करून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करताना मतदार म्हणून विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली व ईव्हीएम मशीन सारखीच मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया वापरण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. यामध्ये हेड बॉय म्हणून कन्हैय्या कैलास राजपूत ३३ मतांनी विजयी झाला. त्यानंतर आदिनाथ निकम याने १०२ मते मिळवली. हेड गर्ल पदासाठी गायत्री घुले हिला ९४ मते मिळाली आणि २४ मताने विजय झाला. सह्याद्री चव्हाण हिला ७० मते मिळाली त्यानंतर श्रुती राजपूत हिला ७० मते मिळाली.
या संपूर्ण प्रक्रिया अनुभवत असताना विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या निवडणुकीसाठी शाळेचे अध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ मार्गदर्शनाखाली सचिव प्रमोद महाजन, मुख्याध्यापक कय्युम खान, समन्वयक कोमल काकडे, शितल नरोडे, शिक्षिका भाग्यश्री नरोडे, वंदना केतके, वंदना चव्हाण, सुरेखा हिवाळे, पूजा राजपूत, सोनाली लबडे, अर्चना मालपणी, दत्तू काळवणे, श्वेता बत्तीसे, समीर शेख, प्रविण आळंजकर, अमोल जेजुरकर, शिवनाथ चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.