< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); योगपटूंनी सादर केलेल्या योगासनांनी जिंकली उपस्थितांची मने – Sport Splus

योगपटूंनी सादर केलेल्या योगासनांनी जिंकली उपस्थितांची मने

  • By admin
  • July 23, 2025
  • 0
  • 49 Views
Spread the love

धाराशिव जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा

धाराशिव : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या अधिपत्याखाली धाराशिव जिल्हा स्पोर्ट्स योगासन असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत जिल्हाभरातून सहभागी योगपटूंनी आपली कसब दाखवत सादर केलेल्या योगासनांनी उपस्थितांची मने जिंकली आहेत.

धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण जिल्हा योगासन संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, सहसचिव राजेश बिलकुले, इंदुमती जाधव, वंदना इंगळे, सीमा चौरे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेत डॉ रविजीत देडे, प्रणाली जगदाळे, विनिता जाधव, श्रेया गरड, तेजस अलसेट यांनी पंच म्हणून काम पहिले.

या स्पर्धेतून सुवर्णपदक विजेते योगपटूंची छत्रपती संभाजीनगर व संगमनेर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली असून ते राज्यस्तर स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धेचा अंतिम निकाल सुवर्णपदक विजेते योगपटू
ट्रॅडिशनल योगासन प्रकारात १० ते १४ वर्षे मुलांच्या वयोगटात ईश्वर भांगे, मुलींमध्ये तेजश्री कोळी, १४ ते १८ वर्षे मुलींमध्ये श्रुती गरड, १८ ते २८ मुलांमध्ये सिद्देश कात्रे, मुलींमध्ये मयुरी पवार, २८ ते ३५ वर्षे महिला वयोगटात आसिया पटेल, ३५ ते ४५ वर्षे पुरुष गटात सतीश साबळे, महिला गटात डॉ परवीन मुल्ला, ४५ ते ५५ पुरुष गटात बालाजी खंडागळे, महिला गटात इंदुमती जाधव, रिदमिक पेयर प्रकारात १० ते १४ वर्षे वयोगटात मुलामध्ये ईश्वर भांगे व इशांत भांगे मुलींमध्ये सिद्धी जाधव व इशिका चव्हाण, आर्टिस्टिक वैयक्तिक प्रकारात १० ते १४ वर्षे मुलींमध्ये सिद्धी चव्हाण, मुलांमध्ये राजवीर पोतदार, रिदमिक पेअर प्रकारात १० ते १४ वर्षे वयोगट मुलींमध्ये प्रीती तरंगे व ईश्वरी सरक, १४ ते १८ वयोगटात श्रुती गरड व संस्कृती कुतवळ, सुपाइन इंडिविज्युअल प्रकारात १० ते १४ वर्ष मुलात राजवीर पोतदार, मुलीत अंजली साळुंके, ३५ ते ४५ वर्षे पुरुष गटात परमेश्वर चौरे, हॅन्ड बॅलन्स प्रकारात १० ते १४ वर्षे मुलींमध्ये सिद्धी चव्हाण, ट्विस्टिंग बॉडी प्रकारात १० ते १४ वर्षे मुलींमध्ये इशिका चव्हाण, मुलात जयराज देशमुख, १४ ते १८ मुलींमध्ये फातिमा शेख, ३५ ते ४५ वर्षे पुरुष गटात सतीश साबळे, हॅन्ड बॅलन्स प्रकारात १० ते १४ वर्ष मुलीत सिद्धी चव्हाण, बॅक बेंडिंग प्रकारात १० ते १४ वर्ष मुलीत सई नलावडे, १४ ते १८ वर्ष मुलीत संस्कृती कुतवळ, लेग बॅलन्स प्रकारात १० ते १४ वर्षे मुलात वैभव खंडागळे, मुलीत ज्ञानेश्वरी कवडे,२८ ते ३५ महिला गटात सीमा चौरे, फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात १० ते १४ वर्ष प्रकारात मुलांमध्ये इशांत भांगे, मुलीत सिद्धी जाधव, १४ ते १८ वर्ष वयोगट मुलीत समृद्धी माळी, १८ ते २८ वर्ष मुलीत मयुरी पवार, २८ ते ३५ महिला गटात सीमा चौरे या खेळाडूंनी यश संपादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *