
निफाड (विलास गायकवाड) ः राष्ट्रीय मिनी फुटबॉल फाईव्ह स्पर्धा नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत क्रीडा सह्याद्रीच्या संघाने चमकदार कामगिरी बजावली.
या स्पर्धेत क्रीडा सह्याद्री क्लबच्या संघाने कर्णधार समर्थ कायस्थ, अथर्व जावरे, प्रसाद बडवर, संकप्ल पंडित, यशवंत अण्णा, चैतन्य गायकवाड, आदेश जंगम या खेळाडूंनी शानदार कामगिरी बजावली.
या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल त्यांचे क्रीडा सह्याद्रीचे अध्यक्ष विलास गायकवाड व क्रीडा सह्याद्री सदस्य विनोद गायकवाड यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले.
तसेच क्रीडा सह्याद्री सदस्य राहुल कुलकर्णी, लखन घटमाळे, चेतन कुंदे, दत्तू रायते, रमेश वडघुले, प्रतीक्षा कोटकर, विजय घोटेकर, कीर्ती कोटकर, श्याम चौधरी यांनी सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक विलास गायकवाड यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभत आहे.