< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); भारताची दमदार फलंदाजी, ४ बाद २६४ – Sport Splus

भारताची दमदार फलंदाजी, ४ बाद २६४

  • By admin
  • July 23, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शनची अर्धशतके, ऋषभ पंत दुखापतग्रस्त

मँचेस्टर : यशस्वी जैस्वाल (५८), साई सुदर्शन (६१) यांची शानदार अर्धशतके आणि केएल राहुल (४६), ऋषभ पंत (निवृत्त ३७) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने चौथ्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर चार बाद २६४ धावा काढल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने ८३ षटके खेळली असून रवींद्र जडेजा १९ तर शार्दुल ठाकूर १९ धावांवर खेळत आहेत. ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला असून त्याच्या दुखापतीविषयी कोणताही माहिती सांगण्यात आलेली नाही. त्यामुळे तो कसोटीत पुढे खेळू शकेल की नाही हे स्पष्ट नाही. 

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. शुभमन गिलने सलग चौथ्यांदा नाणेफेक गमावली.  यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने दमदार सुरूवात केली. राहुल-जैस्वाल जोडीने पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी करत इंग्लंडचे सर्व डावपेच उधळून लावले. स्टोक्सचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंडला महागडा ठरू शकतो. 

यशस्वी जैस्वालची मोठी कामगिरीयुवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने भारताच्या पहिल्या डावात ९६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १२ वे अर्धशतक आहे. १०७ चेंडूत ५८ धावा काढल्यानंतर तो बाद झाला. या मालिकेतील हे त्याचे तिसरे अर्धशतक आहे. आतापर्यंत त्याने चालू मालिकेत ५८, ०, १३, २८, ८७, ४, १०१ धावांच्या डाव खेळल्या आहेत. यासह जैस्वालने मोठी कामगिरी केली. इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक ५० प्लस धावा करणारा तो तिसरा भारतीय सलामीवीर ठरला. या प्रकरणात अव्वल स्थानावर सुनील गावसकर आहेत. त्यांनी ६६ डावांमध्ये २० वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या २४ डावांमध्ये आठ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या. आता यशस्वीने इंग्लंडविरुद्ध १६ डावांमध्ये आठ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. केएल राहुल मागे नाही. त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटीत २७ डावांमध्ये सात वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या.

डावातील ३०व्या षटकात केएल राहुल ४६ धावांवर बाद होऊन तंबूत परतला. ९८ चेंडूत ४ चौकारांसह त्याने दमदार खेळी केली. वोक्स याने त्याला स्लिपमध्ये झेलबाद केले. त्यानंतर साई सुदर्शन मैदानात उतरला. त्याला यष्टीरक्षकाने एक जीवदान दिले. त्याचा त्याने पुरेपूर फायदा उठवला. यशस्वी बाद झाल्यानंतर शुभमन गिल एक खराब निर्णय घेऊन बाद झाला. गिलने स्टोक्सचा चेंडू न खेळता केवळ पॅडने रोखला. स्टोक्सचे जोरदार अपील पंचांनी उचलून धरत गिलला पायचीत बाद ठरवले. तिसऱ्या पंचांकडे धाव घेतल्यानंतरही निर्णयात काही बदल होऊ शकला नाही. गिल १२ धावांवर बाद झाला. गेल्या तीन डावांत गिलची कामगिरी प्रचंड निराशाजनक ठरली आहे. चहापानाला अगदी १२ मिनिटे बाकी असताना स्टोक्सने गिलची महत्त्वाची विकेट घेतली.
 
ऋषभ पंत व साई सुदर्शन या जोडीने शानदार फलंदाजी केली. या जोडीने अर्धशतकी भागीदारी करुन डावाला आकार दिला. वोक्सच्या गोलंदाजीवर पंत दुखापतग्रस्त झाला. पंत ३७ धावांवर निवृत्त होऊन तंबूत परतला. पंतने दोन चौकार व एक षटकार मारला. पंत-सुदर्शन जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. साई सुदर्शन याने पहिले कसोटी अर्धशतक झळकावत त्याला खेळवण्याचा निर्णय सार्थ ठरवला. सुदर्शन १५१ चेंडूंत ६१ धावा काढून बाद झाला. त्याने सात चौकार मारले. स्टोक्सने सुदर्शनला बाद करुन भारताला चौथा धक्का दिला. 

जैस्वालच्या इंग्लंडविरुद्ध १००० कसोटी धावा पूर्ण
याशिवाय, यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्ध १००० कसोटी धावा पूर्ण केल्या. हा पराक्रम करणारा तो २० वा भारतीय फलंदाज ठरला. हा युवा फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनसह १६ डावांमध्ये हा पराक्रम करणारा संयुक्तपणे दुसरा सर्वात जलद भारतीय फलंदाज ठरला. या प्रकरणात राहुल द्रविड अव्वल स्थानावर आहे, ज्याने इंग्लंडविरुद्ध १५ कसोटी डावांमध्ये १००० कसोटी धावा पूर्ण केल्या.

रिव्हर्स स्वीप खेळताना ऋषभ पंतला दुखापत झाली
भारताच्या डावाच्या ६८ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ऋषभ पंतला दुखापत झाली. षटकाच्या चौथ्या चेंडूवर ऋषभला रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. पण तो चेंडू नीट जोडू शकला नाही. बॅटमधून चेंडू सुटल्यानंतर तो थेट त्याच्या पायावर गेला. यानंतर, पंत बराच वेळ वेदनेने ओरडताना दिसला. दुखापतीनंतर लगेचच फिजिओ मैदानात आले आणि बराच वेळ त्याच्याशी बोलले. पंतला इतका वेदना होत होत्या की तो नीट चालतही येत नव्हता. त्याला रुग्णवाहिकेतून मैदानाबाहेर नेण्यात आले. पंतची दुखापत किती गंभीर आहे आणि तो या सामन्यात सहभागी होईल की नाही याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नाही. परंतु अशा प्रकारे दुखापत होणे हे टीम इंडियासाठी एक मोठा धक्का आहे. पंतने निवृत्त होण्यापूर्वी ४८ चेंडूत ३७ धावा केल्या होत्या.

लियाम डॉसनने २९२४ दिवसांनी घेतली विकेट 
डॉसनने २०१७ मध्ये भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर इंग्लंडने त्याला संघातून वगळले आणि आता तो टीम इंडियाविरुद्ध संघात परतला आहे. डॉसनला या सामन्यात आतापर्यंत फक्त एकच विकेट घेता आली आहे. यशस्वीची विकेट घेऊन त्याने विकेटचे खाते उघडले. 

प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला कधीही सामना जिंकता आलेला नाही

मँचेस्टरच्या इतिहासाबद्दल बोललो तर, येथील सुमारे १४१ वर्षांच्या इतिहासात असे कधीही घडलेले नाही की प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकण्यात यश मिळवले असेल. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने एकतर पराभव पत्करला असेल किंवा सामना अनिर्णित राहिला असेल. म्हणजेच, जर इंग्लंड संघाने हा सामना जिंकला तर तो एक ऐतिहासिक विजय असेल. याचे सर्व श्रेय कर्णधार स्टोक्सलाच द्यायला हवे. पण इतिहास काय सांगतो ते देखील विचारात घेतले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *