
इंग्लंडमध्ये एक हजार धावा पूर्ण करणारा पाचवा भारतीय फलंदाज
मँचेस्टर ः भारतीय संघाचा सलामीवीर के एल राहुल याने इंग्लंडविरुद्ध सुरू झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली. आता राहुल इंग्लंडमध्ये १००० कसोटी धावा पूर्ण करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. या प्रकरणात त्याने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडसारख्या दिग्गजांची बरोबरी केली.
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताकडून सलामीला आलेल्या केएल राहुलने मोठी कामगिरी केली. त्याने १५ धावा काढताच इंग्लंडमध्ये १००० कसोटी धावा पूर्ण केल्या. तो इंग्लंडमध्ये १००० कसोटी धावा पूर्ण करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर (१५७५ धावा), राहुल द्रविड (१३७६ धावा), सुनील गावस्कर (११५२ धावा) आणि विराट कोहली (१०९६ धावा) यांनी ही कामगिरी केली.
राहुलने गावसकरांची बरोबरी केली
याशिवाय, केएल राहुल परदेशात १०० पेक्षा जास्त धावा करणारा चौथा भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला. या प्रकरणात त्याने सुनील गावसकर यांची बरोबरी केली. या माजी फलंदाजाने वेस्ट इंडिजमध्ये १४०४ धावा, इंग्लंडमध्ये ११५२ धावा आणि पाकिस्तानमध्ये १००१ धावा केल्या. त्याच वेळी, केएल राहुलने इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून १००० धावा पूर्ण केल्या.