
राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचा सत्कार
निफाड (विलास गायकवाड) ः निफाड तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि नियोजन संदर्भात निफाड तालुका क्रीडा संकुल येथे निफाड तालुका क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निफाड तालुका क्रीडा केंद्रप्रमुख सुभाष खाटेकर यांनी केले. या सहविचार सभेत सन २०२५-२६ साठी तालुक्यातील शालेय क्रीडा नियोजन तयार करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा कार्यालयातील तालुका क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी मार्गदर्शन केले. क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे यांनी सर्व क्रीडाशिक्षकांना ऑनलाइनखेळाडू प्रवेश यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी, तालुका क्रीडा, केंद्र प्रमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत निफाड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेची निवड करण्यात आली. ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात तालुकाध्यक्ष विलास निरभवने, उपाध्यक्ष गोविंद कांदळकर, सचिव माणिक गीते, मार्गदर्शक रामराव बनकर, भीमराव काळे यांचा समावेश आहे.
निवड झालेल्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मागील वर्षी राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य मिळविणाऱ्या खेळाडूंचा व त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक, विद्यमान चेअरमन यांचा सत्कार संपन्न झाला. सहविचार सभेचे सूत्रसंचालन क्रीडा समिती अध्यक्ष विलास निरभवणे यांनी केले. गणेश जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहिल शेख, विलास गायकवाड यांच्यासह तालुक्यातील शिक्षकांनी सहकार्य केले.