
छत्रपती संभाजीनगर ः विभागीय क्रीडा संकुल येथे रुजू झालेले नूतन क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांचे विभागीय क्रीडा संकुल कोचेस संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी विभागीय क्रीडा संकुल कोचेस संघटनेचे विनोद माने (क्रिकेट), भिकन अंबे (स्केटिंग), सिद्धार्थ जाधव (बॅडमिंटन), भरत रेड्डी (अॅथलेटिक्स), रोहित गाडेकर (स्क्वॉश), रणजीत पवार (जिम्नॅस्टिक), अंजली शिरशीकर (जिम्नॅस्टिक्स), डॉ विठ्ठल नरके (तिरंदाजी), असलम शेख (फुटबॉल), आशुतोष मिश्रा (टेनिस) आदी उपस्थित होते. यावेळी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी संकुलातील सर्व प्रशिक्षकांची चर्चा केली. .