
मुंबई ः जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्या वतीने मुंबई उपनगर शालेय क्रीडा स्पर्धा २०२५- ६ या हंगामाचे आयोजन करण्याच्या दृष्टीने नियोजनासाठी २२ जुलै रोजी मराठी भाषा भवन, मुंबई विद्यापीठ, कलिना, सांताक्रूझ (पूर्व) येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने कुर्ला, अंधेरी, बोरिवली तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता.
या बैठकी दरम्यान स्पर्धा प्रवेशिका भरणे, खेळाडूंचे ओळखपत्र तयार करणे, स्पर्धेसाठीच्या फी बाबत तसेच स्पर्धेचे आयोजन करणे व कागदपत्रांची पूर्तता करणे इत्यादींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर रश्मी आंबेडकर यांच्यासह मार्क धर्माई, प्रीती टेमघरे, अभिजीत गुरव, अमोल दंडवते, मानसी गावडे, ऋचा आळवेकर, ऋतुजा कडलगे, मनीषा गारगोटे हे सर्व क्रीडा अधिकारी व उपनगर जिल्ह्यातील अनेक शालेय क्रीडा शिक्षक उपस्थित होते.