
जळगाव ः जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा सॉफ्टबॉल प्रशिक्षण केंद्र अंतर्गत सराव करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू कांचन बडगुजरचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कांचन बडगुजर हिने चीन येथे १५ ते १९ जुलै दरम्यान संपन्न झालेल्या महिला सॉफ्टबॉल आशिया कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तिचा आणि तिचे आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक किशोर चौधरी यांचा सत्कार केला. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू कांचन बडगुजर हिच्याशी जिल्हाधिकारी यांनी हितगुज करून पुढील करिअर विषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक हे उपस्थित होते..