
नवीन दंडाळे अध्यक्षपदी तर डॉ तुषार देशमुख यांची फेरनिवड
अमरावती ः चांदुर बाजार तालुक्यातील क्रीडा स्पर्धा नियोजन सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी तालुका स्तरावरील विविध खेळांचे आयोजन तारखा निश्चित करण्यात आल्या. या प्रसंगी तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यात नवीन दंडाळे यांची अध्यक्षपदी आणि डॉ तुषार देशमुख यांची सचिवपदी फेरनिवड करण्यात आली.
चांदुरबाजार शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा येत्या ११ ऑगस्टपासून सुरू होणार असून ११ सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत. या स्पर्धा नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे सदस्य नरेंद्र देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तालुका उपाध्यक्ष प्रवीण मोहोड, सुधीर राहाटे, सदस्य मोहम्मद इकबाल, स्पर्धा नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे सदस्य नरेंद्र देशमुख उपस्थित होते. या बैठकीला तालुका उपाध्यक्ष प्रवीण मोहोड, सुधीर राहाटे,सदस्य मोहम्मद इकबाल, संयोजक पंकज उईके, सचिव डॉ तुषार देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी माऊली स्पोर्टचे संचालक प्रतीक देशमुख व पर्यवेक्षक राजेश वानखडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कुस्ती, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल, योगासन, मैदानी स्पर्धा आदींचे नियोजन करण्यात आले आहे. तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये नव्याने अध्यक्षपदी नवीन दंडाळे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी प्रवीण मोहोड, सुधीर राहाटे तर संयोजक पंकज उईके व सचिवपदी डॉ तुषार देशमुख यांची फेरनिवड करण्यात आली. सहसचिव म्हणून मनिष नागले, सदस्य म्हणून आर एल वानखडे, मोहम्मद इकबाल, निलेश बोडखे, प्रिया देशमुख, सल्लागार म्हणून डी आर नांदुरकर, प्रसिद्धी प्रमुख म्हणून सुयोग गोरले यांची निवड करण्यात आली आहे.